Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार, 9 जिल्ह्यात 24 सभा घेणार; कसा असणार महाराष्ट्र दौरा?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारलाय. आजपासून जरांगे पाटील पुन्हा रस्त्यावर उतरणार असून ९ जिल्ह्यात जरांगे २४ सभा घेणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलंय
मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला पुन्हा सुरूवात होतेय. यावेळी त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. तर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारलाय. आजपासून जरांगे पाटील पुन्हा रस्त्यावर उतरणार असून ९ जिल्ह्यात जरांगे २४ सभा घेणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारला इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांनाही इशारा दिलाय. दुसरीकडे छगन भुजबळ यांच्याविरोधात छावा संघटना आक्रमक झाली आहे. येणाऱ्या निवडणुकीत छगन भुजबळ यांना पराभवाची चव चाखायला लावणार, असा इशारा त्यांनी दिला. राज्यातील मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय. असा आरोप शरद पवार आणि दानवे यांनी केलाय. बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: Nov 15, 2023 10:51 AM
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
