कलंकित अन् वाया गेलेला मंत्री, जालन्यातून जरांगे पाटलांची पुन्हा छगन भुजबळांवर जहरी टीका
सरकारमधील सर्वात कलंकित मंत्री, जाती-जातीत दंगली भडकवणारा आणि वाया गेलेला मंत्री, कायद्याच्या पदावर असताना कायदा पायदळी तुडवणारा माणूस म्हणजे छगन भुजबळ.. असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर एकेरी शब्दात हल्लाबोल
मुंबई, १ डिसेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाही. जालन्यातील सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केलाय. राज्यातील सरकारसह नारायण कुचे आणि धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार टीकास्त्र त्यांनी केलं. सरकारमधील सर्वात कलंकित मंत्री, जाती-जातीत दंगली भडकवणारा आणि वाया गेलेला मंत्री, कायद्याच्या पदावर असताना कायदा पायदळी तुडवणारा माणूस म्हणजे छगन भुजबळ.. असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर एकेरी शब्दात हल्लाबोल केलाय. मराठा आरक्षणाची मागणी आम्ही आमच्या लेकरांसाठी केली, तर काय चूक केली, आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेणार असे म्हणत जरांगेंनी जालन्यातून पुन्हा एल्गार पुकारला. बघा नेमका काय केला हल्लाबोल?
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

