AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स

मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स

| Updated on: Aug 18, 2026 | 8:36 PM
Share

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईमध्ये मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संभाव्य आंदोलनासाठी जरांगे पाटलांनी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज केला आहे. त्यामुळे, हे आंदोलन अंतरवली सराटी येथे होणार की मुंबईत, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, मुंबईतील तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीतील आंदोलनासाठी अद्याप […]

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईमध्ये मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संभाव्य आंदोलनासाठी जरांगे पाटलांनी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज केला आहे. त्यामुळे, हे आंदोलन अंतरवली सराटी येथे होणार की मुंबईत, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, मुंबईतील तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीतील आंदोलनासाठी अद्याप परवानगी मागितलेली नाही, तर मुंबईसाठी अर्ज केला आहे.

या अर्जामध्ये जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे आणि पांडुरंग तारख यांची नावे आहेत. यामुळे २९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत उत्सुकता वाढली आहे. याच दरम्यान, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रतिमोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा मराठा समाजाच्या कुणबीकरणाद्वारे ओबीसी आरक्षणात समावेशाच्या विरोधात असेल, असे हाके यांनी स्पष्ट केले आहे. जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेवर टीकाही करण्यात आली आहे.

Published on: Aug 18, 2026 08:36 PM

Follow Us