महायुतीच्या प्रचाराची रणनिती ठरली, ‘वर्षा’वर रात्री ११ ते दीडपर्यंत खलबतं, शिंदे, फडणवीस अन् दादांच्या बैठकीत काय झालं?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती कशी असणार यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल बैठक पार पडली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नेमकं काय ठरलं या बैठकीत बघा व्हिडीओ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. रात्री ११ ते दीड वाजेपर्यंत वर्षावर या तिनही नेत्यांची बैठक सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती या बैठकीमध्ये ठरवण्यात आली. इतकंच नाहीतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे, संवाद दौरा, प्रत्येक मतदारसंघात सभा घेण्याचा निर्णयही या तिनही नेत्यांमध्ये झाला. येत्या २० ऑगस्टपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या जाहीर सभा सुरू होणार आहेत. २० ऑगस्टपासून सातही विभागात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे दौरे सुरू होणार असून कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरूवात होणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

