मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित, केंद्राचा संबंध नाही : रावसाहेब दानवे

मराठा आरक्षण हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित येतो. केंद्र सरकारचा याच्याशी संबंध नाही. राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली (Raosaheb Danve on Maratha Reservation).

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीरपणे झडती घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी जाफराबाद ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी तडकाफडकी निलंबित केलं. याच पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षण हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित येतो. केंद्र सरकारचा याच्याशी संबंध नाही. राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली (Raosaheb Danve on Maratha Reservation).