Raj Thackeray : राज ठाकरे यांचा आजपासून विदर्भ दौरा! आजपासून 22 सप्टेंबरपर्यंत विदर्भात मुक्काम
Raj Thackeray in Nagpur : या दौऱ्यादरम्यान, नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. फक्त नागपुरातच नव्हे, तर विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना राज ठाकरे भेटी देणार आहे. 22 सप्टेंबरपर्यंत राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असणार आहे.
नागपूर : आजपासून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात होते आहे. मनसे अध्यक्ष हे आज नागपुरात वेगवेगळ्या आढावा बैठका घेणार आहे. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आगामी निवडणुकांच्या (Municipality Elections) दृष्टीने मनसेची (Nagpur Politics) ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरेंचा मिशन विदर्भ दौरा महत्त्वाचा मानला जातोय. या दौऱ्यादरम्यान, नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. फक्त नागपुरातच नव्हे, तर विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना राज ठाकरे भेटी देणार आहे. 22 सप्टेंबरपर्यंत राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असणार आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका राज ठाकरे घेणार आहेत. उद्या ते नागपुरात जाहीर पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर याच दिवशी ते चंद्रपूरसाठी रवाना होणार आहे. चंद्रपूर, अमरावती, बुलडाणा, वर्धा, असा दौरा करुन ते पुन्हा अमरावतीत येणार आहे. अमरावतीत राज ठाकरे पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत.
Published on: Sep 18, 2022 07:34 AM
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी

