शिवसेना मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची रिकामी, तर उद्या… संदीप देशापांडेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी शिवसेना मेळाव्यातील राऊतांच्या खुर्चीवरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
मुंबई : काल मुंबईमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी यावेळी शिंदे गट आणि भाजपावर (BJP) घणाघात केला. मात्र त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी शिवसेना मेळाव्यातील राऊतांच्या खुर्चीवरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती, उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल तयारी ठेवा’. असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे. यापूर्वी देखील अनेकदा संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. आता शिवसेना देशपांडे यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?

