राखी सावंत हिने केले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल, कोणी केला थेट आरोप?
राखी सावंतला आज अटक करण्यात आली आहे. अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली असून एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक
‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंतला आज अटक करण्यात आली आहे. अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली असून एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक झाली आहे. राखी सावंतने माझ्यावर अनेक खोटे आरोप केले, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, माझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले, असे म्हणत राखी सावंतविरोधात मॉडेल शर्लिन चोप्राने तक्रार केली.
जेव्हा जेव्हा मी कोणाच्या विरोधात आवाज उठवला तेव्हा राखी सावंतने मला रोखण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या अंतर्गत आम्ही आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. राखी सावंतने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले, त्यानंतर पोलिसांनी आज राखीला अटक केली. अंबोली पोलिसांनी एफआयआर 883/2022 संबंधी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला, असे ट्विट शर्लिनने केले आहे.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!

