कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? खासदार बजरंग सोनवणे यांचा सवाल
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण झाल्यानंतर निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय असलेल्या वाल्मिकी कराड याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर या २२ दिवसांनी वाल्मिकी कराड पुणे सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांनी एकत्र येत बीड येथे आक्रोश मोर्चा काढला होता. यानंतर आज २२ दिवसांना या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल असलेले वाल्मिकी कराड अखेर पुणे सीआयडीला शरण आले आहेत. त्यांनी सरेंडर येण्यापूर्वी व्हिडीओ शेअर करीत आपल्या या प्रकरणात राजकीय द्वेषामुळे गोवले आहे. कोर्टात जर सिद्ध झाले तर आपण देईल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे वाल्मिकी कराड यांनी म्हटले आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी कराड हे जर निर्दोष आहेत तर त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी शरण यायला पाहीजे होते. एवढा वेळ का लावला असा सवालही खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

