AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचे मोठं विधान, काय म्हणाले?

माझ्या राजीनाम्याची… MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचे मोठं विधान, काय म्हणाले?

| Updated on: Sep 02, 2026 | 1:32 PM
Share

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. जानेवारी २०२६ मध्ये घटना घडली असून, मी पदभार स्वीकारण्यापूर्वीची ही बाब आहे, असे त्यांनी म्हटले. आयोगाने याची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, पुनरावृत्ती टाळण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याची माहितीही भिमनवार यांनी दिली.

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वस्तुस्थिती मांडली. भिमनवार यांच्या म्हणण्यानुसार, औषध निरीक्षक परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी २०२६ मध्ये घडली होती. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ १८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली, तर प्रत्यक्ष कार्यभार ३ मार्च २०२६ रोजी स्वीकारला. म्हणजेच, ही घटना त्यांच्या पदभार स्वीकारण्यापूर्वी घडली होती. तरीही, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तसेच, परीक्षा प्रक्रियेत सुधारणा सुचवण्यासाठी शासनानेही एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. कोणत्याही गंभीर आरोपांचे मूल्यांकन वस्तुस्थिती, अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झाले पाहिजे, असे भिमनवार यांनी स्पष्ट केले.

Published on: Sep 02, 2026 01:32 PM

Follow Us