AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...

Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न…

| Updated on: Sep 01, 2026 | 3:30 PM
Share

मुंबईतील कूपर रुग्णालयात बुरखा घातलेल्या महिलेला प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाने मात्र गर्भवती महिला वॉर्डात ओळख पटवण्यासाठी व लहान बाळं चोरीला जाण्यासारख्या घटना टाळण्यासाठी हे सुरक्षिततेचे उपाय आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावरून सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वादही झाले.

मुंबईतील प्रसिद्ध कूपर रुग्णालयात बुरखा घातलेल्या महिलांना प्रवेश नाकारल्याचा आरोप समोर आला आहे. रुग्णालयातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांसोबत हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयात प्रवेशासाठी बुरखा काढण्याची अट ठेवल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संबंधित महिलांचे वादही झाले.

या घटनेनंतर कूपर रुग्णालयाच्या प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विशेषतः गर्भवती महिला वॉर्डमध्ये प्रवेश करताना, चेहरा झाकलेला बुरखा घातल्यास संबंधित व्यक्ती महिला आहे की पुरुष, हे ओळखणे प्रशासनासाठी कठीण होते. यापूर्वी लहान बाळं चोरीला जाण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अशा परिस्थितीत जर एखाद्या गर्भवती महिलेचे बाळ चोरीला गेले, तर प्रशासन काय उत्तर देईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

त्यामुळे, कूपर रुग्णालयाचे प्रशासन जर कोणाला गर्भवती महिलांच्या वॉर्डात जाताना चेहरा दाखवण्याची विनंती करत असेल, तर ही त्या महिलांची आणि त्यांच्या लहान बाळांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची एक काळजी आहे. प्रशासनाच्या मते, हा निर्णय रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असून, यावर धर्माचे राजकारण करणे योग्य नाही. रुग्णालयाने घेतलेला हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Sep 01, 2026 03:30 PM

Follow Us