AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल

‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल

| Updated on: Aug 29, 2026 | 9:36 PM
Share

तुम्ही स्वतःला देव समजता की काय अशा शब्दांत मुंबई हायकोर्टानं तुकाराम मुंडेंच्या अन्न आणि औषध प्रशासनाला फटकारलंय. निमित्त मुंबईतील एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशननं केलेल्या याचिकेचं. काही दिवसांपूर्वी एफडीएनं एमसीए कॅन्टीनचा परवाना रद्द केला होता. बघूयात. राज्यातसह देशातही तुकाराम मुंडेंच्या खात्याच्या कारवायांचं कौतुक होत असताना दुसरीकडे तुम्ही स्वतःला देव समजता का अशा शब्दात मुंबई उच्च […]

तुम्ही स्वतःला देव समजता की काय अशा शब्दांत मुंबई हायकोर्टानं तुकाराम मुंडेंच्या अन्न आणि औषध प्रशासनाला फटकारलंय. निमित्त मुंबईतील एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशननं केलेल्या याचिकेचं. काही दिवसांपूर्वी एफडीएनं एमसीए कॅन्टीनचा परवाना रद्द केला होता. बघूयात. राज्यातसह देशातही तुकाराम मुंडेंच्या खात्याच्या कारवायांचं कौतुक होत असताना दुसरीकडे तुम्ही स्वतःला देव समजता का अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने अन्न आणि औषध प्रशासन खात्यावर टीका केली. फक्त टीकाच नाही तर मुंबईतल्या वांद्रेतील एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कॅन्टीन तातडीने सुरू करण्याचेही आदेश कोर्टानं दिलेत. 20 ऑगस्टला मुंडेंच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने एमसीएच्या कॅन्टीनची पाहणी केली. किचनला ११० पैकी ८७ गुण देण्यात आले. त्यानंतर २५ ऑगस्टच्या फेरनिरीक्षणात गुणांकन वाढवून ११० पैकी ९५ झाले. पण कॅन्टीन परवाना एमसीएच्या नावे असूनसुद्धा ते शिरके इन्फ्रास्ट्रक्चरकडनं चालवलं जात होतं. त्यामुळे एफडीएनं कॅन्टीनचा परवाना रद्द केल्यामुळे एमसीएनं कोर्टात धाव घेतली होती. त्यावर तुम्ही स्वतःला देव समजता का? असा सवाल उच्च न्यायालयाने एफडीला विचारलाय. मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. एफडीएनं कायदेशीर स्थितीचा पूर्णपणे अभ्यास न करता अनावश्यक घाई का केली? आम्ही तुमचा विभाग आणि अधिकाऱ्यांना खडसावून थकलो आहोत, यापूर्वीचं प्रकरण पुन्हा विचारात घेण्याचे कोर्टाचे निर्देश असतानाही एफडीएनं व्यवहारिक ऐवजी केवळ तांत्रिक दृष्टिकोन स्वीकारत परवाना रद्द केला. म्हणून आता कठोर आदेश देण्याची वेळ ओढवली आहे. निर्देश असतानाही कारवाई का? हे आम्हाला पटवून द्या. अन्यथा न्यायालयाचा अवमान म्हणून तुरुंगात जावं लागेल. तुमचे अधिकारी नाउमेद होऊ नयेत म्हणून अजून कितीवेळा आम्ही समतोल साधायचा? तलवारीने डास मारले जात नाहीत? असं आपण का म्हणतो? तुम्ही देव आहात, तुम्ही काहीही करू शकता असं तुम्हाला वाटतं का? असे प्रश्न कोर्टानं तुकाराम मुंडेंच्या अन्न आणि औषध प्रशासनाला विचारलेत.

Published on: Aug 29, 2026 09:36 PM

Follow Us