Mumbai Local Train Video : …नाहीतर महाराष्ट्रात ठेवणार नाही तुला, दोन महिलांमध्ये बाचाबाची, बघा व्हायरल VIDEO
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला दुसऱ्या अमराठी महिलेला "मराठी बोल नाहीतर ठेवणार नाही तुला महाराष्ट्रात" असे म्हणताना ऐकू येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलांच व्हायरल होत आहे.
मराठी आणि हिंदी या भाषेचा वाद आता सर्वत्र होताना पाहिला मिळतोय. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये हिंदी आणि मराठी भाषेवरून वाद झाल्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. त्यामुळे, प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच नवी मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये हिंदी-मराठी भाषेवरून वाद झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. लोकल ट्रेनमध्ये हिंदी-मराठी भाषेवरून होणाऱ्या वादामुळे, सामाजिक सलोखा बिघडत असून भाषिक सौहार्दाला देखील धक्का बसत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला मी मराठी बोलणार नाही.. असं म्हणत मुजोरी करताना दिसतेय. हा सगळा प्रकार नवी मुंबई येथील लोकल ट्रेनमध्ये झाल्याची माहिती मिळतेय. एक महिला समोरच्या परप्रांतीय महिलेला मी मराठी बोलतेय कारण मी महाराष्ट्रात आहे माझ्या… तू महाराष्ट्रात राहतेस मग मराठीतच बोल मग.. मराठी नाही बोलता येत तर ठेवणार नाही तुला महाराष्ट्रात असं बोलताना दिसतेय. परप्रांतीय महिलेने मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर हा भाषा वाद पाहायला मिळालाय.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

