धक्कादायक! तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने…संभाजीनगरात हाय वोल्टेज ड्रामा!
विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. या घडामोडीमुळे ठाकरे गटाने लगेच मोठा खेळ केला.
विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. या घडामोडीमुळे ठाकरे गटाने लगेच मोठा खेळ केला. गणेश लोखंडे यांनी आधीच अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यामुळे महाविकास आघाडीने आता गणेश लोखंडेंना त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील अंबादास दानवे यांनी स्वतः देवयानी डोनगावकर यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर देवयानी यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने खळबळ उडाली.
महत्त्वाची बाब म्हणजे, देवयानी डोनगावकर यांचा अर्ज मागे घेण्यामागे मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेने उमेदवारी दिलेल्या देवयानी डोनगावकर यांच्या पतीच्या कारखान्याला अचानक नोटीस आल्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतल्याचे दिसून येत आहे. या विषयाने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Jun 04, 2026 04:41 PM
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

