दार उघडलं आणि सर्वजण हादरले; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?
नागपूर शहरातील प्रसिद्ध न्यूरॉन रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांचा त्यांच्या केबिनमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
नागपूर शहरातील प्रसिद्ध न्यूरॉन रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांचा त्यांच्या केबिनमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. चांदेवार हे नेहमीप्रमाणे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी दिवसभराची वैद्यकीय कामे आणि रुग्णांची तपासणी पूर्ण केल्यानंतर विश्रांतीसाठी आपल्या केबिनमध्ये गेले होते. मात्र, बराच वेळ उलटल्यानंतरही ते बाहेर न आल्याने सहकाऱ्यांना संशय आला.
सहकाऱ्यांनी केबिनचा दरवाजा अनेकदा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी केबिनचा दरवाजा उघडल्यानंतर डॉ. चांदेवार हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. वैद्यकीय तपासणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेतील महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांच्या केबिनमध्ये काही इंजेक्शन्स आढळून आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, इंजेक्शनच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळावरील पुरावे आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांच्या अकस्मात निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून नागपूरमध्ये शोककळा पसरली आहे.
Published on: Jun 23, 2026 11:36 AM
दार उघडलं आणि सर्वजण हादरले'; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?
मी लागतो नादाल चल, दाखव काय..., राऊतांचं संजय पाटलांना थेट आव्हान
ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार
येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; नेत्याच्या मुलाची पोस्ट व्हायरल

