Narayan Rane | संजय राऊतांची मानसिक स्थिती खराब, हीच ब्रेकिंग न्यूज- नारायण राणे
Narayan Rane on Sanjay Raut : सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. संजय राऊत यांना तक्रारी करण्यासाठी कुणी ऑथोराईज केलंय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याची मानसिक स्थिती खालावली असल्याचं राणे म्हणालेत.
सिंधुदुर्ग : नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर संजय राऊतांनी (Sanjay Raut) बुधवारी पत्रकार परिषद (Press conference) घेतली. या पत्रकार परिषदेतून नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मानसिक स्थिती खराब आहे आणि हीच ब्रेकिंग न्यूज आहे, असं वक्तव्य नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं आहे. सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. संजय राऊत यांना तक्रारी करण्यासाठी कुणी ऑथोराईज केलंय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याची मानसिक स्थिती खालावली असल्याचं राणे म्हणालेत. गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत, संजय राऊत विरुद्ध भाजप अशा पत्रकार परिषदांची मालिकाच महाराष्ट्रानं पाहिली आहे. दरम्यान, आता नवाब मलिक यांना ईडीननं अटक केल्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत घेत संजय राऊतांवर टीका केली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?

