Ladki Bahin Yojana : पोर्टल अपडेट नाही, नोटिफिकेशन नाही, लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन बोजवारा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा सरकारकडून करण्यात आली. यानंतर अवघ्या काही तासातच महिलांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी सेतू, तहसील कार्यालयात एकच झुंबड केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज करण्याची मुदत 1 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र यामध्ये मुदतवाढ देण्यात आली असून आता 31 […]
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा सरकारकडून करण्यात आली. यानंतर अवघ्या काही तासातच महिलांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी सेतू, तहसील कार्यालयात एकच झुंबड केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज करण्याची मुदत 1 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र यामध्ये मुदतवाढ देण्यात आली असून आता 31 ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. तर 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलैपासून दर माह 1500/- रूपये आर्थिक लाभ मिळणार आहे. सरकारने ही घोषणा केली मात्र लाडकी बहीण योजनेचे पोर्टल अद्याप सुरूच झाले नसल्याचे समोर आले आहे. 1 तारखेला पोर्टल सुरू होणं अपेक्षित असताना पोर्टल अद्याप बंदच आहे. त्यामुळे सेतू कार्यालयात सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर ऑफलाईन प्रक्रियेनंतर ऑनलाईन प्रक्रिया पुन्हा करावी लागणार असल्याने सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा ताण वाढणार आहे.
Published on: Jul 03, 2024 05:01 PM
गद्दारी कराल तर याद राखा!; खासदारांच्या फुटीच्या चर्चेत राऊतांचा इशारा
त्या प्रकरणासाठी ओमराजे निंबाळकरांवर दबाव, संजय राऊतांनी सांगूनच टाकलं
15- 15 कोटी मिळेपर्यंत ते चार्टेड विमानतही चढले नव्हते अन्... संजय
50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा
