AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर

Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल… छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर

| Updated on: Oct 17, 2026 | 3:26 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखातं पुन्हा मिळणार नाही, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. यावर छगन भुजबळ यांनी मात्र काही अडचणी असतात, पण अर्थखातं नक्की मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीकडून सातत्याने अर्थखात्याची मागणी होत असून, मुख्यमंत्री सध्या हे खाते सांभाळत आहेत.

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा अर्थखाते मिळेल की नाही, यावरून सध्या चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी, पक्षाला अर्थखाते पुन्हा मिळणार नाही, असा दावा केला आहे. भाजपला मी ओळखतो, त्यामुळेच भाजपने अजित दादा गेल्यानंतर अर्थमंत्री पद चोरून घेतल्याचे रोहित पवार म्हणाले. भाजपने काही दिले नाही आणि देणारही नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे त्यांचे मत आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र वेगळे मत मांडले आहे. “काही अडचणी असतात, पण अर्थखाते पुन्हा मिळेल,” असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला आहे. कर्जमाफी किंवा दुष्काळ निवारणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांमुळे सध्या मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडे ठेवले असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार अर्थखात्याची मागणी केली जात आहे. सरकार म्हणून आम्ही एकत्रित काम कर

Published on: Oct 17, 2026 03:26 PM

Follow Us