कोल्हापुरी पायतान Vs कापशी चप्पल! जितेंद्र आव्हाड – हसन मुश्रीफ आले आमने-सामने, नेमकं कशावरून जुंपली?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल जितेंद्र आव्हाड - हसन मुश्रीफ यांच्यात जुंपली, काय आहे नेमकं प्रकरण? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, २६ ऑगस्ट २०२३ | सध्या राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र आव्हाड – हसन मुश्रीफ यांच्यात सामना सुरू झालाय. कोल्हापूरमधून जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापुरी पायतानानं ठेचून काढा असं म्हटलं तर हसन मुश्रीफ यांनी कपाशी चप्पलेनं आवाज काढणार असं म्हणत पलटवार केलाय. जितेंद्र आव्हाड – हसन मुश्रीफ यांच्यातील शाब्दिक वार थेट कोल्हापुरी पायतान Vs कापशी चप्पल इथपर्यंत येऊन पोहोचलेत. कोल्हापूरमध्ये शरद पवार गटाची जाहीर सभा झाली. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांचा उल्लेख गद्दार साप असा करत कोल्हापूरी पायतानानं ठेचा अशी जळजळीत टीका केली. त्यानंतर कोल्हापूरी कापशी करकर वाजणारी चप्पल बसली की कळेल. असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्यावर शाब्दिक पलटवार केलाय. बघा जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांच्यात नेमकी कशावरून जुंपली..?
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

