गुलाबी रंगामुळे ‘राजकीय’ फायदा होणार? विरोधकांच्या टीकेला रुपाली पाटलांचं थेट उत्तर
पक्षाला एक नवा रंग, रुप देण्याची तयारी अजित पवार गटाकडून करण्यात येतेय. यासाठी अजित पवार गटाकडून गुलाबी रंगाचा वापर प्रत्येक ठिकाणी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. मग ते अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट असुदे किंवा आणि पक्षाच्या गुलाबी रंग रुप... राज्यात गुलाबी जॅकेटची चर्चा...
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून आखण्यात आलेल्या विशेष रणनीती सध्या चर्चा होतेय. पक्षाला एक नवा रंग, रुप देण्याची तयारी अजित पवार गटाकडून करण्यात येतेय. यासाठी अजित पवार गटाकडून गुलाबी रंगाचा वापर प्रत्येक ठिकाणी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. मग ते अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट असुदे किंवा आणि पक्षाच्या गुलाबी रंग रुप… राज्यात गुलाबी जॅकेटची चर्चा असताना आता चर्चा सुरू असताना राज्यातील गरीब महिलांना रोजगार मिळावा यासाठी अजित पवार यांनी गुलाबी रिक्षा योजनेची घोषणा केली मात्र विरोधकांनी यावरून चांगलाच हल्लाबोल केला. यावरच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी विरोधकांना फटकारलंय. विरोधकांचं काम एकच असतं सत्ताधाऱ्यांवर टीका करणं. पण अजित पवार गट राष्ट्रवादीची जन सन्मान यात्रा असेल किंवा अजित पवार यांची काम करण्याची जी शैली त्यामुळे जनतेच्या मनात जो विश्वास आहे तो आम्हाला दृढ करायचा आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.
Published on: Aug 05, 2024 05:05 PM
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
