तर जीभ जागेवर ठेवणार नाही, फडणवीसांविरोधात केलेल्या टीकेनंतर भाजप नेत्यांकडून जरांगे पाटील टार्गेट
फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलं जात असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी शाम मानव आणि मनोज जरांगे पाटील हे विरोधकांचे कुत्रे असल्याचे म्हणत सडकून टीका केली आहे. शाम मानव आणि मनोज जरांगे पाटील हे...
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलं जात असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी शाम मानव आणि मनोज जरांगे पाटील हे विरोधकांचे कुत्रे असल्याचे म्हणत सडकून टीका केली आहे. शाम मानव आणि मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर भुंकण्यासाठी ठेवण्यात आलेले कुत्रे आहेत. इतकंच नाहीतर फडणवीस यांच्या अंगावर विरोधकांनी हे दोन कुत्रे सोडले आहेत, असं अनिल बोंडे म्हणाले तर यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जीभ वळवळल्यात पुढे काय करायचे ते ठरवू. त्यांची जीभ जागेवर ठेवायची की नाही हे बघून घेऊ, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे. तर मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडीची सुपारी घेऊन मराठ्यांची दिशाभूल करत आहेत, असा हल्लाबोल देखील भाजप नेत्यांनी केला आहे.
Latest Videos
Latest News