परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; NEET प्रकरणातील नैराश्यातून 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
देशभरात 3 मे 2026 रोजी पार पडलेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीची ही महत्त्वाची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड निराशा आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या धक्कादायक प्रकरणामुळे देशातील विविध भागांमध्ये तीन विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पेपरफुटी प्रकरणात मुख्य सूत्रधारासह काही आरोपींना अटक करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून सुरू आहे. अखेर NEET परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली असून, आता 21 जून 2026 रोजी देशभरात पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली गेले आहेत. उत्तर पश्चिम दिल्लीतील आदर्श नगर भागात NEET परीक्षा दिलेल्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिला परीक्षेत चांगले गुण मिळण्याची अपेक्षा होती, मात्र परीक्षा रद्द झाल्याचा तिला मोठा मानसिक धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
तसेच राजस्थानमधील सिकर येथे 22 वर्षीय विद्यार्थ्यानेही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने यापूर्वी दोन वेळा NEET परीक्षा दिली होती आणि यंदा यश मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पेपरफुटी आणि परीक्षा रद्द झाल्यामुळे तो नैराश्यात गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. याशिवाय गोव्यातील एका 18 वर्षीय विद्यार्थ्यानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनांमुळे NEET पेपरफुटी प्रकरणाचे गंभीर परिणाम समोर येत असून, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत