NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; अंधश्रद्धेचा क्लास? मोटेगावकरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या शिवराज मोटेगावकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मोटेगावकर हा पुण्यातील ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC)चा संचालक असून सीबीआयने त्याला या प्रकरणात अटक केली आहे.

मोटेगावकरने आपल्या मुलासाठी NEET पेपर विकत घेतल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मोटेगावकर वर्गातील बाकावर उभा राहून विद्यार्थ्यांवर आंब्याच्या पानांनी पाणी शिंपडताना दिसत आहे. एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात आंब्याची पाने घेऊन तो विद्यार्थ्यांना “तुम्ही AIIMS मध्ये प्रवेश मिळवणार” अशा शुभेच्छा देताना दिसत आहे.
हा प्रकार विज्ञान शिकवणाऱ्या वर्गात घडल्याने समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. विज्ञानवादी संघटनांनी या प्रकारावर आक्षेप घेत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार असल्याची टीका केली आहे. दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: May 24, 2026 11:56 AM
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...