AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...

ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे…

| Updated on: Jun 25, 2026 | 11:44 AM
Share

ठाकरे गटाला मोठा धक्का देत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर विकास कामांच्या निधीप्रकरणी जोरदार टीका केली. आता धाराशिवमध्ये 18 कोटी रुपयांच्या निधीवरून नवा वाद सुरू झाला आहे. शहरातील आठवडी बाजारासाठी 8 कोटी, राजमाता जिजाऊ उद्यानासाठी 5 कोटी, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी 3 कोटी आणि बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी 2 कोटी निधी मंजूर झाला आहे. या निधीचे श्रेय घेण्यावरून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजीत सिंह पाटील समर्थकांमध्ये वाद रंगला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे दोघांच्या समर्थकांनीही सोशल मीडियावर पोस्ट केली आहे… दोन्हीमध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे आणि श्रेयवाद उफाळला आहे. यामध्ये सर्व विकास कामांसाठी निधी मंजूर असं लिहिलेलं आहे. त्यावर आता पाटील समर्थकांनी थेट आम्ही पाठपुरावा केल्याने कामाला यश आलं आहे असं नमूद केलं आहे….

Published on: Jun 25, 2026 11:37 AM

Follow Us