पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच भयंकर घडलं…
गणेशोत्सव काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना पेणमधील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये सध्या जोरदार लगबग सुरू आहे. बाप्पाच्या आकर्षक मूर्ती घडवण्यासाठी मूर्तीकार रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. मात्र, मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसाने पेण तालुक्यातील कळवा गावातील एका गणेशमूर्ती कारखानदाराचे मोठे नुकसान झाले आहे.
गणेशोत्सव काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना पेणमधील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये सध्या जोरदार लगबग सुरू आहे. बाप्पाच्या आकर्षक मूर्ती घडवण्यासाठी मूर्तीकार रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. मात्र, मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसाने पेण तालुक्यातील कळवा गावातील एका गणेशमूर्ती कारखानदाराचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक कारखान्यात पावसाचे पाणी शिरल्यामुळे शेकडो गणेशमूर्ती पाण्यात भिजल्या.
कळवा गावातून जाणाऱ्या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह काही कारणांमुळे अडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याचे पाणी पुढे न जाता उलट कारखान्याकडे वळले. काही वेळातच कारखान्यात गुडघाभर पाणी साचले. कारागिरांना परिस्थिती समजण्याआधीच अनेक कच्च्या आणि तयार मूर्ती पाण्यात भिजल्या.
पेणच्या गणेशमूर्ती जगभर प्रसिद्ध आहेत. येथील मूर्तीकार वर्षभर कष्ट करून आणि कर्ज काढून मूर्ती तयार करतात. मात्र, पहिल्याच पावसात अनेक मूर्तींचे रंग खराब झाले असून काही मूर्ती पूर्णपणे नुकसानग्रस्त झाल्या आहेत.
Published on: Jun 24, 2026 12:14 PM
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलम
टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच नार्वेकरांनी मागितली माफी
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का?

