रावेत भागात होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू; चंद्रकांत पाटील यांचं महत्वाचं ट्विट
रावेत भागात होर्डिंग कोसळून दुर्घटना; चंद्रकांत पाटील ट्विट करत म्हणाले...
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील रावेत भागात होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. काल इथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तेव्हा, हे होर्डिंग कोसळून यात 8 जण अडकले होते. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत रावेत पोलिसांनी माहिती दिली आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केलं आहे. “पुणे जिल्ह्यातील रावेत येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळाली. सदर घटनेतील जखमी व्यक्तींना रावेत मधील ओजस हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, मी स्वतः या घटनेनंतर जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त यांच्या संपर्कात आहे. जखमींना उत्तमोत्तम उपचार मिळावेत, यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा, यासाठी प्रार्थना करतो!”, असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
आज पुणे जिल्ह्यातील रावेत येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळाली. सदर घटनेतील जखमी व्यक्तींना रावेत मधील ओजस हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, मी स्वतः या घटनेनंतर जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, पिंपरी…
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 17, 2023
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत

