AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘...सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले’; शिंदे यांची ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

‘…सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले’; शिंदे यांची ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Jun 24, 2023 | 3:53 PM
Share

देशातील महत्वाचे 15 पक्ष यात सामिल झाले होते. यावेळी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील सहभागी झाली होती. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांची पटना येथे बैठक पार पडली. यावेळी देशातील महत्वाचे 15 पक्ष यात सामिल झाले होते. यावेळी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील सहभागी झाली होती. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांनी ट्विट करत ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणारे उद्धव ठाकरे काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले असा घणाघात केला आहे. तर सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही व झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत असेही त्यांनी म्हटलं आहे. तर सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 24, 2023 03:53 PM

Follow Us
वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण.

वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

साप मानसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी, डॉक्टरांनाही फुटला घाम, तुमच्यासोबतही होऊ शकते अशी घटना.

साप मानसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी, डॉक्टरांनाही फुटला घाम, तुमच्यासोबतही होऊ शकते अशी घटना

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?.

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप.

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप