भाजपच्या पायाखालची वाळू सरकतेय, म्हणून राहुल गांधी यांना टार्गेट केलं जातंय; ‘या’ नेत्याचं टीकास्त्र
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना जामीनही मंजूर झालाय. पाहा व्हीडिओ...

मुंबई : “भाजपाला आता कळून चुकलंय की, त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे. त्यामुळे ते राहुल गांधी यांना टार्गेट करत आहेत. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे. याचा मी निषेध करतो आणि भविष्यामध्ये देखील ज्या ज्या वेळी अशा पद्धतीची कारवाई होईल काँग्रेस नेहमीच निषेध नोंदवेल”, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. सावरकरांनी जे चांगलं काम केले त्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे. पण जे वाईट केलंय, त्याबद्दलही आम्ही बोलत आहोत. त्याच्या इतका आटापिटा करायची काय गरज आहे? भाजपला इतक्या मिरच्या झोंबायची गरज काय?, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us