AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EL Nino : एल-निनोचे मोठे संकट, रब्बी पिकांना मोठा फटका, डाळींसह खाद्यतेलांवर संक्रांत

एल -निनोने हवामानाची स्थिती बिघडू शकते. कुठे प्रमाणापेक्षा जास्त पाऊस तर कुठे पाण्याच्या टंचाईने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतील. खरीप पिकांना फटका बसला असताना आता रब्बी हंगामही संकटात येणार आहे.

EL Nino : एल-निनोचे मोठे संकट, रब्बी पिकांना मोठा फटका, डाळींसह खाद्यतेलांवर संक्रांत
declaration of drought
| Updated on: Sep 28, 2026 | 6:33 PM
Share

देशात एल- निनोचे संकट शेतीला मोठा फटका देणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदाचे हवामान शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारे ठरणार आहे. एल-निनोने रब्बी पिकांची चिंता वाढविली आहे. जेथे सिंचनाच्या ऐवजी पावसाच्या भरोसे शेती होते तेथे रब्बी सिझन अडचणी तयार करु शकतो असे कृषी सचिव अतिश चंद्र यांनी म्हटले आहे. जर पावसाची गणित बिघडले तर गहू, राई, डाळ आणि तिळाचे उत्पादनावर परिणाम होणार असल्याने खाद्य तेलावर देखील संकट येऊ शकते.

कृषी सचिव म्हणाले की रब्बी सिझनमध्ये पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी  पेरण्या केल्या आणि पाऊसच आला नाही तर पिके अडचणीत येतील.

देशात खास करुन उत्तरेत रब्बी पिकांची पेरणी ऑक्टोबर पासून सुरु होते. गहू आणि राईची यात महत्वाची पिके आहे. या शेतीला योग्यवेळी आवश्यक आद्रता गरजेची असते. खासकरुन पावसावर अवलंबून असलेले शेतकरी हवामानावर विसंबून असतात. अशात पाऊस कमी झाला तर शेतातील आद्रता कमी किंवा जास्त झाली. किंवा शेतात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी जमले तरीही दोन्हीही गोष्टी पिकांसाठी संकट बनू शकतात.

जास्त पाऊसही धोक्याचा…

शेतकऱ्यांसाठी धोका केवळ कोरड्या दुष्काळाचा नाही तर कृषी सचिवांनी सांगितले काही राज्याच्या मातीत आवश्यकतेपेक्षा जास्त आद्रतेची समस्या येऊ शकते. तर कमी पावसाच्या भागातील पिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्याच कारणामुळे यंदा रब्बी सिझनची तयारी सामान्य प्रकारे झालेली नाही. वेग-वेगळ्या भागात हवामान आणि पाण्याची स्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल.

638 लाख हेक्टरवर रब्बी पिके

देशात रब्बीचे पिके सुमारे ६३८ लाख हेक्टर जमीनीवर घेतली जातात. यात गव्हाची शेती ३०० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात घेतली जाते. सुमारे १४० लाख हेक्टरमध्ये डाळी, ८७ लाख हेक्टरमध्ये तिळ आणि ५५ लाख हेक्टरमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांची शेती होते. म्हणजे हवामानाने दगाफटका दाखवला तर याचा परिणाम केवळ एकाच पिकांवर होणार नाही.

खरीपनंतर आता रब्बी पिकांची बारी

यंदा खरीप सिझन देखील सोपा नव्हता. अनेक राज्यात शेतकऱ्यांना आधी पेरणी पूर्ण करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात अडचणी आल्या आणि नंतर उभ्या पिकाला वाचवणे आव्हानात्मक बनले. आता रब्बी पिकांची वेळ असून एल – निनोने चिंतेत वाढ केली आहे. पावसावर अवलंबून असलेल्या भागात जास्त चिंता आहे.

भारत अन्न -धान्यांच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. मात्र डाळी आणि तिळाची गरज पूर्ण करण्यासाठी आयात करावी लागेल. जर रब्बी उत्पादन घटले तर पुढे गहु, डाळी, खाद्य तेलाच्या पुरवठ्यावर आणि किंमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Follow Us
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड