पुण्यातील वाहतूक कोंडीविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन, का होतेय ट्राफीक?
VIDEO | गेल्या काही दिवसापासून पुण्यातील सदाशिव पेठेसह इतर काही भागात करण्यात आलेल्या रस्ते खोदाईमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
पुणे : पुणे शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदाईमुळे चौकाचौकात वाहतूक कोंडी फटका सर्व सामान्य पुणेकरांना बसत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यात हे खोदकाम करण्यात आले आहे. दरम्यान, या रस्ते खोद कामाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज जोरदार आंदोलन करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षपणामुळे शहरात आज खोदाई सूरु आहे. ज्यामुळे सर्व सामान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसापासून पुण्यातील सदाशिव पेठेसह इतर काही भागात करण्यात आलेल्या रस्ते खोदाईमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पुणेकरांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. तर सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.

