Pune | आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्… नागरिकांची संतप्त मगाणी, चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी गावात कडकडीत बंद
राज्यात गुन्हेगारीच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यातदेखील महिलांवर, लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची संख्या खूपच वाढत आहे. ही बाब अत्यंत चित्ताजनक असताना पुण्यातून असाच एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. चार वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाने अत्याचार केला
राज्यात गुन्हेगारीच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यातदेखील महिलांवर, लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची संख्या खूपच वाढत आहे. ही बाब अत्यंत चित्ताजनक असताना पुण्यातून असाच एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. चार वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाने अत्याचार केला इतकेच नाही, तर अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं आहे. या कुकर्मांनंतर आरोपीने मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला.
या हृदयद्रावक घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटना आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी थेट आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मगाणी केली आहे. आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कोणाकडे वेळ नसेल तर आमचा न्याय आम्ही स्वतः हिसकावून घेऊ. पोलिसांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला आहे.
या घटनेमुळे राज्यभरात आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस दल सखोल तपास करत असले तरी, नागरिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. स्थानिकांनी परिसरात बंद पाळला असून आरोपीला शिक्षेची मागणी केली आहे.
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात...
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...

