AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश

तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला… गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश

| Updated on: Jun 03, 2026 | 6:41 PM
Share

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथे गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बोगस डॉक्टरकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या मदतीने घरामध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचे उघड झाले आहे. या तपासणीसाठी संबंधितांकडून 35 ते 50 हजार रुपये घेतले जात होते.

या प्रकरणी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गुजर यांनी याबाबत तक्रार दिली होती. गर्भलिंग निदानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

यवत पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून तपासात आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या रॅकेटमध्ये 7 ते 8 डॉक्टरांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान मशीन जप्त करण्यात आली असून गर्भलिंग निदानानंतर महिलांना गर्भपातासाठी पाठवले जात असल्याचे उघड झाले आहे. डॉ. अतुल जाधव यालाही अटक करण्यात आली असून आणखी 2 डॉक्टर फरार आहेत. गेल्या 2 वर्षांत तब्बल 500 गर्भपात झाल्याची नोंद समोर आली आहे.

Published on: Jun 03, 2026 06:13 PM

Follow Us