केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण, हा महाराजांचा अपमान : प्रशांत जगताप

महापालिकेत अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करणार आहेत.महाराजांच्या कार्याचा हा अपमान आहे, असं प्रशांत जगताप म्हणाले.

केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण, हा महाराजांचा अपमान : प्रशांत जगताप
प्रशांत जगताप
Image Credit source: TV9 Marathi You Tube
| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 7:27 PM

राष्ट्रवादी काँग्रेस नरेंद मोदींच्या दौऱ्याला विरोध करणार असल्याची माहिती आहे. नरेंद्र मोदी, भाजप नेते आणि राज्यपाल सातत्याने शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढतात. महापालिकेत अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करणार आहेत.महाराजांच्या कार्याचा हा अपमान आहे. भव्य प्रांगणात कार्यक्रम व्हावा पुणेकरांची हजेरी याला असावी, अशी आमची मागणी आहे. मागणी मान्य झाली  नाहीतर आम्ही आणखी ताकदीनं निषेध करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.  पुणेकरांनी रस्त्यावर उतरण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलंय.