AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...

पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच…

| Updated on: Jul 27, 2026 | 3:57 PM
Share

पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता शहरातील रस्त्यांना बसू लागला आहे. पुणे स्टेशन परिसरातील चौकात रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता शहरातील रस्त्यांना बसू लागला आहे. पुणे स्टेशन परिसरातील चौकात रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याचा वरचा थर पूर्णपणे निघून गेला आहे. अनेक ठिकाणी मोठे आणि खोल खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांना वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. वाहतुकीच्या गर्दीच्या वेळी या खड्ड्यांमुळे कोंडीही वाढत असल्याचे दिसून येत आहे.

पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. विशेषतः स्टेशन परिसरातून दररोज हजारो नागरिक प्रवास करत असल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, संबंधित विभागाकडून परिस्थितीची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे लवकर सुरू करण्यात यावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात रस्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे.

Published on: Jul 27, 2026 03:57 PM

Follow Us