अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का? बड्या नेत्याचं ते तुफान विधान चर्चेत
विधानसभेच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या उच्चारांचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे, तसेच विरोधकांनीही यावर जोरदार टीका केली आहे.
विधानसभेच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या उच्चारांचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे, तसेच विरोधकांनीही यावर जोरदार टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील नार्वेकर यांच्या वाचनशैलीचा समाचार घेतला.
यानंतर खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत संतप्त प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना मराठी वाचता आणि बोलता न येणे हा गंभीर प्रकार आहे. “हे नार्वेकर नसून नॉर्वेकर आहेत,” असा टोलाही राऊत यांनी लगावला. तसेच महाराष्ट्रात मराठी सक्तीची भाषा असल्याचे सरकार सांगते, मात्र विधानसभा अध्यक्षांनाच मराठी नीट येत नसल्याचे त्यांनी म्हटले. पुढे तर राऊतांनी जे विधान केले त्याने मोठी खळबळ उडाली. ते म्हणाले, जर आपण मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षावाल्याला मारतो, मग तसंच नार्वेकरांनाही मारायचं का?
विधानसभा अध्यक्ष प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव वाचताना अडखळले होते. पुढे राऊत म्हणाले, ‘आशा भोसले यांच्यासारख्या महान गायिकेचा शोकप्रस्ताव नीट वाचता न आल्याने मराठी भाषेचा अपमान झाला’.
Published on: Jun 24, 2026 11:41 AM
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,

