पुन्हा तारीख पे तारीख? वेडावाकडा निर्णय आला तर…, ठाकरेंना आमदार अपात्रतेच्या निकालाचा आला अंदाज?
शिवसेना अपात्रतेसंदर्भात आज निकाल लागणार आहे. पण राहुल नार्वेकर यांच्या निकालापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शाब्दिक तोफ डागली. निकाल येण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. राहुल नार्वेकर यांनी कायद्यानुसार निर्णय द्यावा. वेडावाकडा निर्णय देऊ नये, असे सांगत असताना लवकरच निवडणुका आहेत, असे ठाकरे म्हणाले.
मुंबई, १० जानेवारी २०२४ : शिवसेना अपात्रतेसंदर्भात आज निकाल लागणार आहे. पण राहुल नार्वेकर यांच्या निकालापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शाब्दिक तोफ डागली आहे. वेडावाकडा निर्णय आला तर निवडणुका आहे तशाच…त्यासोबत एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या झालेल्या भेटीवरून निकालाची कल्पना आलीच असेल हे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. हा निकाल येण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. राहुल नार्वेकर यांनी कायद्यानुसार निर्णय द्यावा. वेडावाकडा निर्णय देऊ नये, असे सांगत असताना लवकरच निवडणुका आहेत, असे ठाकरे म्हणाले. शिंदेसह १६ आमदार अपात्र झाले तर सरकारच कोसळेल. तर कारण अपात्रतेच्या यादीत स्वतः मुख्यमंत्री आहेत. शिंदेंसह १६ आमदार वैध ठरवले तर मग सरकारला धोका नाही. पण निकाल ठाकरेंच्या विरोधात आले तर ठाकरेंचे १४ आमदार आपात्र होणार…बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

