Bhiwandi | रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, ‘राजा शिवाजी’चित्रपाटच्या प्रदर्शनानिमित्त खास आयोजन
भिवंडीतील शिवक्षेत्रात नुकताच एक विशेष धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रचारासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भिवंडीतील शिवक्षेत्रात नुकताच एक विशेष धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रचारासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकार रितेश देखमुख उपस्थित होता. त्याने शिवभक्तांसोबत संवाद साधत चित्रपटाविषयी सविस्तर सांगितले. त्याशिवाय महाराजांना त्रिवार मानाच मुजरा केला. कार्यक्रमादरम्यान त्याने महाआरती देखील केली. यावेळी रितेश देशमुख म्हणाला.’अनेक दिवसांपासून इच्छा होती मात्र, आज हा योगायोग आला मला खूप चांगलं वाटलं, एक उर्जा मिळाली इथे येऊन.’
या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमातून चित्रपटाच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून देणारा हा सोहळा ठरला.
Published on: Apr 26, 2026 10:03 AM
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद

