Abu Azmi Video : अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानानं वाद उफळणार, ‘औरंगजेब हा उत्तम…’
समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल एक वक्तव्यकरून आपल्या आकलेचे तारे तोडल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगजेब याचे अबू […]
समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल एक वक्तव्यकरून आपल्या आकलेचे तारे तोडल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगजेब याचे अबू आझमी यांनी कौतूक करत औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याने अनेक मंदिरे बनवली, असा खळबळजनक दावा अबू आझमी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अबू आझमी यांच्यावर टीका सुरु झाली आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होता. त्याची राजवट पाहूनच इंग्रज भारतात आले होते. वाराणसीमध्ये औरंगजेबाच्या एका सरदाराने पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले होते.’,
Published on: Mar 03, 2025 06:13 PM
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
