फडणवीसांच्या भेटीनंतर मुंडे म्हणाले, ‘मला बेल्स पाल्सी.. I Can’t speak’; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनाम्यावरून हालचाली वाढल्या
अधिवेशनाचा पहिला दिवस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर गाजला. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांकडून होणाऱ्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने विधानभवनातील वातावरण तापलं
विधानपरिषदेच्या कामकाजाचा पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशीच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशनाचा पहिला दिवस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर गाजला. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांकडून होणाऱ्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने विधानभवनातील वातावरण तापलं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाजानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी साधारण १५ मिनिटे दोघांत चर्चा झाली. तर धनंजय मुंडे यांच्या भेटीपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. विधानभवनातील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या हालचाली वाढल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, करूणा शर्मा यांनी देखील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा १०० टक्के होणार असल्याचे म्हणत मोठा दावा केला होता. त्यामुळे आता राजीनामा होणार का? विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात किती आक्रमक भूमिका घेणार? याकडे साऱ्याचे लक्ष लागून आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

