Aurangabad | मंत्री संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चहाच्या टपरीवर भेट
शिवसेना मंत्री संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या साधेपणाचं एक सुंदर उदाहरण समोर आलं आहे. प्रवीण दरेकर आणि संदीपान भुमरे यांची औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या एका छोट्याशा चहाच्या टपरीवर भेट झाली. याच ठिकाणी या दोघांनी धूरकटलेल्या शेगडीवरील गोड चहाचा आस्वाद घेतला आणि गप्पाही मारल्या.
औरंगाबाद : शिवसेना मंत्री संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या साधेपणाचं एक सुंदर उदाहरण समोर आलं आहे. प्रवीण दरेकर आणि संदीपान भुमरे यांची औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या एका छोट्याशा चहाच्या टपरीवर भेट झाली. याच ठिकाणी या दोघांनी धूरकटलेल्या शेगडीवरील गोड चहाचा आस्वाद घेतला आणि गप्पाही मारल्या. या वेळी या दोघांच्या साधेपणाची चर्चा तर झालीच. मात्र त्याबरोबर शिवसेना आणि भाजपचा संघर्ष टोकाला गेलेला असतानाही या दोन्ही पक्षातील नेत्यांमधला जिव्हाळा अजूनही कायम असल्याचं दिसून आलं.
Follow Us
Latest Videos
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान

