हृदयद्रावक! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला अश्रू अनावर
सांगलीमध्ये रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथकाच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून मृत तरुणाच्या आईने रुग्णालयासमोर आक्रोश केला. संबंधित तरुणाला शुगरचा त्रास होता.
सांगलीमध्ये रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथकाच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून मृत तरुणाच्या आईने रुग्णालयासमोर आक्रोश केला. संबंधित तरुणाला शुगरचा त्रास होता. अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात येत होते.
मात्र प्रवासादरम्यान रुग्णाला आवश्यक असलेल्या ग्लुकोज, ऑक्सिजन आणि इतर प्राथमिक वैद्यकीय सुविधा वेळेत देण्यात आल्या नाहीत, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपचारात झालेल्या निष्काळजीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे एका वरिष्ठ डॉक्टरांनी देखील योग्य उपचार वेळेत मिळाले असते तर रुग्णाला वाचवता आले असते, असे मत व्यक्त केले आहे.
या घटनेनंतर मृत तरुणाच्या आईला अश्रू अनावर झाले. “माझा एकुलता एक मुलगा गेला,” असा हंबरडा फोडत तिने न्यायाची मागणी केली.
Published on: May 23, 2026 05:25 PM
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

