महायुतीत मिठाचा खडा? सांगलीत भाजप-शिवसेना आमनेसामने, नेमकं काय घडलं..
सांगलीत तरुणीच्या आत्महत्येनंतर सत्तेतील दोन पक्ष आमनेसामने आलेले बघायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.
सांगलीत एका तरुणीच्या आत्महत्येमुळे शिंदेसेनेचे स्थानिक कार्यकर्ते-पदाधिकारी आणि भाजप आमनेसामने आले. गोपीचंद पडळकर आणि सुहास बाबर या दोन्ही आमदारांनाचे समर्थक एकमेकांच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करता आहेत.
काही टोळक्यांच्या छळामुळे एका दहावीत शिकणाऱ्या मुलीने स्वत:च जीवन संपवलं आहे. त्यावरून आता सत्तेतीलच दोन नेत्यांमध्ये वादंग पेटलं आहे. सांगलीतल्या खालापूर तालुक्यात शिंदे गटाने भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधु ब्रम्हानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे. तर भाजप पदाधिकारी खालपूरातील शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. या मुलीने पंधरा दिवसांपूर्वी आत्महत्या केली. काही तरुणांकडून या मुलीला सातत्याने त्रास दिला जात होता. आरोपानुसार लैंगिक छळानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी या पीडितेला दिली जात होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांवर कोणाचा दबाव होता याची चौकशी व्हावी अशी मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. तर दुसरीकडे आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी उद्या आटपाडी बंदची हाक दिली आहे.
Published on: Jul 24, 2025 09:38 AM
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
