Sanjay Raut : ड्युप्लिकेट माल येतो आणि…, संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिली चिनी मालाची उपमा
VIDEO | शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा अभूतपूर्व होणार, संजय राऊत यांनी आशा व्यक्त केली आहे. तर दुसरं कोण काय करत असेल तर त्याच्याशी आम्हाला घेणं नाही. ड्युप्लिकेट माल येतो काही काळ तो राहतो. त्याचा आवाज किती असतो सर्वांना माहिती आहे, असा खोचक टोला लगावला
मुंबई, २२ ऑक्टोबर २०२३ | शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होतो. मेळावा अभूतपूर्व होईल, अशी आशा संजय राऊत यांनी व्यक्त केली. राज्यासह देशातील शिवप्रेमी जनता या मेळाव्याला येईल. दुसरं कोण काय करत असेल तर त्याच्याशी आम्हाला घेणं नाही. ड्युप्लिकेट माल येतो काही काळ तो राहतो. दिवाळीत तसे ते आहेत. चीनी फटाके, दिवे येतात, त्याचा आवाज किती असतो सर्वांना माहिती आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. तर राऊत असेही म्हणाले की, 2024 च्या महाराष्ट्रासह देशातील परिवर्तनाची सुरुवात दसरा मेळाव्यातूनच होणार आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे देशाचं लागलं आहे. इतकंच नाहीतर भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे किती वाजता बोलतील याची विचारणा केलीय. दिल्लीतील मोदी आणि शाह यांनाही उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुकता लागली असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी खोचक टीकाही शिंदे आणि भाजपवर केली.
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
