AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धिवनायक मंदिरात भाविकांची गर्दी! अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणरायाच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक

सिद्धिवनायक मंदिरात भाविकांची गर्दी! अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणरायाच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक

| Updated on: Jun 03, 2026 | 12:15 PM
Share

अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीनिमित्त आज मुंबईच्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच बाप्पांच्या दर्शनासाठी भक्तांनी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. अनेक कुटुंबे, महिला, तरुण आणि लहान मुलांसह भाविक मोठ्या श्रद्धेने गणरायाच्या दर्शनासाठी उपस्थित आहेत.

मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्याच गणरायाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून मंदिरात विशेष पूजा आणि आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने राज्यभरातून भाविक मुंबईत दाखल झाले आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी स्वयंसेवकही मदत करताना दिसले.

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून दिवसभर मंदिरात गर्दी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 03, 2026 12:15 PM

Follow Us