AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! मोठ्या Gold Scam चा पर्दाफाश, सोनाराकडून भयंकर कांड, 133 जणांना जाळ्यात ओढलं

सावधान! मोठ्या Gold Scam चा पर्दाफाश, सोनाराकडून भयंकर कांड, 133 जणांना जाळ्यात ओढलं

| Updated on: Jun 02, 2026 | 11:59 AM
Share

पालघरच्या सातपाटी येथील एका ज्वेलर्सने अनेकांना गंडवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 3 वर्षांपासून अनेक ग्राहकांनी दागिने घडवण्यासाठी तसेच सोने खरेदीसाठी संबंधित दुकानात पैसे आणि सोने जमा केले होते.

पालघरच्या सातपाटी येथील एका ज्वेलर्सने अनेकांना गंडवल्याची माहिती समोर आली आहे. हा सोनार ग्राहकांचे लाखो रुपयांचे सोने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली. गेल्या 3 वर्षांपासून अनेक ग्राहकांनी दागिने घडवण्यासाठी तसेच सोने खरेदीसाठी संबंधित दुकानात पैसे आणि सोने जमा केले होते. मात्र, ग्राहकांना दागिने परत मिळत नसल्याने संशय निर्माण झाला होता.

सुमारे 8 ते 10 ग्राहकांनी काही महिन्यांपूर्वी दुकानात जाऊन चौकशी केली होती. त्यावेळी दुकान मालकाने लवकरच सर्वांचे दागिने परत देण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे अनेकांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती. मात्र, गेल्या आठवड्यात दुकान बंद आढळल्याने आणि मालक कुटुंबासह गायब झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या सोनाराचे नाव असलम शेख असून त्याच्या दुकानाचे नाव सलीमा असे आहे. कित्येकांना त्याने खऱ्या सोन्याच्या बदल्यात बनावट सोने दिल्याचे समोर आले आहे.

यानंतर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 3 किलो सोने आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संबंधित ज्वेलर्सच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.

Published on: Jun 02, 2026 11:59 AM

Follow Us
Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन.

Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन.

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप.

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग.

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार.

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी.

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी