Nagpur Temperature | विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार करण्याची शक्यता
विदर्भात उष्णतेची लाट कायम असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या 24 तासांत अकोला येथे सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भातील इतर सहा जिल्ह्यांमध्येही तापमान 44 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याचं समोर आलं आहे.
विदर्भात उष्णतेची लाट कायम असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या 24 तासांत अकोला येथे सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भातील इतर सहा जिल्ह्यांमध्येही तापमान 44 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, नागपूर येथे आज तापमान 44 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचे चटके इतके तीव्र आहेत की, रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी झाली असून दुचाकीस्वारही शक्यतो बाहेर पडणं टाळत आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता काही ठिकाणी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचं आणि आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
Published on: Apr 25, 2026 04:58 PM
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

