समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात उतरणार? शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘हे’ 5 संभाव्य उमेदवार
Shiv Sena Eknath Shinde Candidate List for Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ४५ जणांचा समावेश आहे. त्यानंतर आता पक्षातील 5 संभाव्य उमेदवारांची नावं समोर येत आहे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली वहिली यादी गेल्या मंगळवारी जाहीर करण्यात आली. शिंदे गट शिवसेनेकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाड मतदारसंघातून भरत गोगावले, कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे यांसह अनेक दिग्गजांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील 5 संभाव्य उमेदवारांची नावं समोर येत आहे. धारावी मतदारसंघातून समीर वानखेडे संभाव्य उमेदवार आहेत. वरळी मतदारसंघातून मलिंद देवरा हे संभाव्य उमेदवार आहेत तर दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून संजय निरूपम हे संभाव्य उमेदवार आहेत. यासोबतच भांडूपमधून अशोक पाटील आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून सुवर्णा करंजे हे सभाव्य उमेदवार असणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Published on: Oct 27, 2024 12:33 PM
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
