एकच खळबळ! शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी भयंकर खेळ, प्रसादाच्या पॅकेटमध्ये…
साईबाबांच्या शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मंदिर परिसरातील अनेक खासगी प्रसाद दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त पेढे विकले जात असल्याची तक्रार भाविकांकडून केली जात आहे.
साईबाबांच्या शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मंदिर परिसरातील अनेक खासगी प्रसाद दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त पेढे विकले जात असल्याची तक्रार भाविकांकडून केली जात आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. दर्शनानंतर अनेक जण प्रसाद म्हणून पेढे खरेदी करतात. मात्र या पेढ्यांवर पॅकेजिंग, उत्पादन तारीख, एक्सपायरी डेट किंवा उत्पादकाची कोणतीही माहिती नसल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी पॅकेटच्या आत दगडासारखे कठीण झालेले अन् काळपट पेढे विकले जात असल्याच्या तक्रारीही आहेत. तसेच पॅकिंग केलेल्या पेढ्यांवर बुरशी लागल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
प्रसादाच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शिर्डी नगरपालिका आणि अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
Published on: Jun 09, 2026 03:38 PM
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...

