‘शरद पवार यांच्या तुकड्यावर कोण जगतंय, देशाला माहितीये’; संजय राऊत यांना कुणी सुनावलं
VIDEO | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत वक्तव्य केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल
रत्नागिरी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत वक्तव्य केले. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रामदास कदम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर खालच्या शब्दात टीका केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संजय राऊत म्हणाले फेकलेल्या तुकड्यावर जगणारे ही लोकं आहेत. यावर रामदास कदम यांनी भाष्य केले आहे. यावेळी रामदास कदम म्हणाले, ‘शरद पवार यांनी फेकलेल्या तुकड्यावर कोण जगतंय हे संपूर्ण देशाला माहिती आहे. ज्याला कावीळ असते त्यांला सगळंच पिवळं दिसत असतं आणि असं वक्तव्य संजय राऊत यांनी करावं हे हास्यास्पद आहे. ‘, असे वक्तव्य करत रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. दरम्यान, यावेळी रामदास कदम यांनी रत्नागिरीतील खेडमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा ही रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला तर रत्नागिरीतील लोकांसाठी मुख्यमंत्री यासभेतून नक्कीच काहीतरी घोषणा करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Published on: Mar 19, 2023 04:44 PM
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
