खेडमधील आजची सभा म्हणजेच रामदास कदमचा ‘दम’, रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देत फटकारलं
VIDEO | 'जिसमे नही दम वो रामदास कदम', या टीकेला रामदास कदम यांचं चोख प्रत्युत्तर अन् दिलं थेट चॅलेंज
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा होतेय. दरम्यान या जाहीर सभेत शिवसेनेचे नेते रामदास कदम नेमका कोणता खुलासा करणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले असून हाच चर्चेचा विषय ठरत आहे. यासभेपूर्वीच आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जिसमे नही दम वो रामदास कदम असे म्हणत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. याच टीकेवर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘रामदास कदम यांच्यात किती दम आहे हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. शिवसेना आणि मातोश्रीसाठी हा रामदास कदम डोक्याला कफन बांधून लढला आहे. त्यामुळे या बांडग्याला काय माहित आहे किसमे कितना है दम… भास्कर जाधव शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेला आणि पुन्हा शिवसेनेत आला. बांडगा आधी कडवा असतो मात्र हा फक्त कडवेपणा दाखवतो… रामदास कदममध्ये किती दम आहे हे पाहायचं असेल तर आज खे़डमध्ये संध्याकाळी सभेला ये कळेल किती दम कोणात आहे’, असे म्हणत रामदास कदम यांनी सडकून भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे.
Published on: Mar 19, 2023 04:02 PM
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
